शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०१३

आज वर्गातील 'आनंद खैर'ह्या मुलाचा वाढदिवस..त्याने वाटण्यास चॉकलेट आणलेले..पण,अचानक ' ४थी ब'चे शिक्षक रजेवर..परिणामी वर्ग एकत्र..८५ विद्यार्थी..आनंदने तर ६६चं चॉकलेट आणलेले..मग मी म्हटलं,"जावू दे,आज नको वाटू या चॉकलेट ..सोमवारी देवू या,'अ'ला द्यायची अन 'ब'ला नाही हे मला नाही आवडणार..
मुले क्षणाचाही विलंब न करता म्हणाली, "मॅडम,चॉकलेट वाटू द्यय..आम्ही अर्धे अर्धे वाटून घेतो.."खरचं गुणी आहेत माझी मुलं..त्यांनी वाटून घेतले चॉकलेट..अन अतिशय आनंदाने मटकावलेही..मला फारसं काही करावं लागलचं नाही मुलं स्वतःचं शिकली 'देतो तो देव अन राखतो तो राक्षस..'खरचं जे आतल्याला नको असतं ते कोणीही देतं पण,जे आपल्याला हवं असतं ते देण्यात खरं सुख असतं..हो ना..!!-रो..

बुधवार, ३० नोव्हेंबर, २०११

*मृदुगंध*

ग्रीष्मानं व्याकुळलेली वसुंधरा..

आषाढातील दुपार..

श्यामल मेघ..

बरसू पाहताय पण बरसत नाही..

प्राण नयनात आणलेल्या त्या चातकाची तीष्ठ्ताही ओसरू पाहतेय..

सर्वच कसं अगतिक..



अनाहूतपणे तो येतो..
तुषार शिंपीत..

थुई थुई नाचत..

नाजूकपणे रिमझिम बरसत..

सृष्टीला शचैल भिजवत..

वसुंधरा अन अंबर ह्यांच्या मिलनाचा तो दूत..

अवघ्या चराचराला नवलाई आणतो..

ऊर भरून घ्यावा असा सुगंध उधळतो..

कस्तुरी,अत्तर,सुमने सर्वच थिटे त्या सामोरी..

असा हा परिमल त्या उत्कट क्षणातच जाणवतो..
पण, 

शाश्वततेने मनाच्या गाभार्यात दरवळत 
राहतो..

हा भावरूपी मृदुगंध..